ग्रामपंचायत डोंगरेज

तालुका–बागलाण, जिल्हा–नाशिक

गावाविषयी-माहिती

महत्त्वाच्या सूचना :
कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा .    |    कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही ऑनलाईन अर्ज भरा​.    |    आपले गावं स्वच्छ आणि सुंदर ठेवा.    |   

गावाविषयी माहिती

डोंगरेज हे गाव नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील सटाणा या मुख्य शहरापासून साक्री ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग 273 वरून 12 किलोमीटर अंतरावर असणारे आणि हत्ती नदीच्या काठावर वसलेले सुंदर असे भाव आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, डोंगरेजचा स्थान कोड किंवा गाव कोड ५५००९० आहे. हे गाव एकूण ८३१.१ हेक्टर भौगोलिक क्षेत्र व्यापते. 

गावाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून या ठिकाणी द्राक्ष पिकापासून ते बाजरी पर्यंत सर्व प्रकारचे ऋतू नुसार शेती उत्पन्न घेतले जाते.

गावात शासकीय क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर जाणारे देखील नागरिक आहेत या गावात आदिवासी समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतमजुरी आहे.

स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत, डोंगरेज गावाचे प्रशासन भारताच्या संविधान आणि पंचायती राज कायद्यानुसार गावाचा निवडून आलेला प्रमुख सरपंच करतो. हे गाव राज्यस्तरीय प्रतिनिधित्वासाठी बागलाण विधानसभा मतदारसंघात आणि राष्ट्रीय संसदीय निवडणुकांसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात येते. स्थानिक प्रशासन गावातील नागरी सेवा आणि विकासासाठी जबाबदार आहे.

ग्रामपंचायत डोंगरेज लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या / गृहे
342 घरं / कुटुंबे
लोकसंख्या
1460 लोक
पुरुष
764
महिला
696696
लिंग गुणोत्तर (Sex Ratio) सुमारे
910 महिला
प्रति
1000 पुरुष
बालसंख्या (0-6 वर्षे)
एकूण 173 इतकी मुले
पुरुष 90
महिला 83
अनुसूचित जमाती / अनुसूचित जाती
489 लोक
Scheduled Caste (SC)
0 लोक
साक्षरता दर
सुमारे 80.26% एकूण साक्षरता
पुरुष साक्षरता ~ 86.35%
महिला साक्षरता ~ 73.57%